मंगळवारी जवान योगेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डोणगाव येथील सैन्यातील जवान योगेश सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त रॉयल फौजी योगेशभाऊ मित्र परिवार डोणगाव तसेच ग्रामस्थ व डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय जळगाव(गोदावरी फाउंडेशन) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 

डोणगाव येथे मंगळवार दि.२२ रोजी जवान योगेश सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त ग्रामपंचायत कार्यालयात महा आरोग्य  शिबिराचे  आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन  सरपंच आशाबाई सुरेश पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या शिबीरात मुतखडा, मूत्र पिंडातील खडे, प्रोस्टेट,पित्ताशय खडा, कर्करोग विभाग,हृदयरोग विभाग,बालरोग विभाग,शस्त्रक्रिया,जनरल मेडिसिन,मेंदू,मनका,फ्रॅक्चर,गर्भपिशवी,नाक,कान , घसा शस्त्रक्रिया, नेत्रालय,अस्थिरोग,मानसोपचार,अँजिओग्राफी,एन्जोप्लास्टी,जनरल मेडिसिन,लिव्हर, पित्ताशयाचे व पोटाचे आजार  आदी सह विविध आजारांवर  मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  शिबीराच्या मार्गदर्शन व नाव नोंदणीसाठी अमोल पाटील ७४९९३६६९८२,विकास कोळी ९३०९७८६०२४,तेजस भालेराव ८५५४८०३३८२,राहुल पाटील ९३५९३४६०५८,गोकुळ सोनवणे ८००७६६०७०७,खुशाल ठोके ८७८८७०८३८० यांच्याशी संम्पर्क साधावा व सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन योगेश भाऊ मित्र परिवार डोणगाव यांच्याकडून करण्यात आलेले आहे.

 

Protected Content