चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनानिमित्त युवा चित्रकार अनिलराज पाटील यांनी ठिंबक्याच्या सहाय्याने छत्रपती शिवरायांचे चित्र रेखाटून त्यांना अभिवादन केले आहे.
चित्रकार अनिलराज पाटील यांनी गोवळ कोंडा येथील अंतरराष्ट्रीय संग्रहालयातील दख्खन शैलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्राची प्रति कृती रेखाटली आहे. या चित्राचे रेखाटन पेन व काळी शाही साह्यने पेनच्या फक्त ठिबक्यांनी हे चित्र पूर्ण केले. ६ जून १६७४ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजयांच्या राज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटले आहे. अनिल पाटील यांनी या चित्राला पूर्ण एक दिवस देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.