युवतीवर अत्याचार करणार्‍यास अटक

 

भुसावळ प्रतिनिधी । सोशल मीडियावरून प्राध्यापक तरूणीशी ओळखी करून तिचे शारिरीक शोषण करणार्‍या अभियंत्याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, निश्‍चय बसंत पालिवाल (वय २६, रा.पिपरीया, ता.होशंगाबाद, मध्यप्रदेश) हा मुक्ताईनगर तालुक्यातील एका प्रकल्पावर अभियंता म्हणून काम करत असतांना त्याची अमरावती येथील मूळ रहिवासी असलेल्या प्राध्यापक तरुणीशी सोशल मीडियावर मैत्री झाली. संशयीताने प्राध्यापिका तरुणीशी ओळख वाढवत मैत्री केली, तसेच लग्नाचे आमीष दाखवून शारिरीक अत्याचार केला. नंतर त्याने लग्न करण्यास नकार दिल्याने, युवतीने पोलिसात ६ ऑगस्ट २०२० रोजी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित पसार झाला होता. अखेर तीन महिन्यांनी त्याचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.

संबंधीत गुन्हा हा बाजारपेठ पोलिसात गुन्हा वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पसार संशयित निश्‍चय बसंत पालिवाल (वय २६, रा.पिपरीया, ता.होशंगाबाद, मध्यप्रदेश) याला पोलिसांनी कणकवली (जि.सिंधूदुर्ग) येथून अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Protected Content