युवक काँग्रेसचा भुसावळ येथे ‘रास्ता रोको’

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज  येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 

काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्द यांच्या निषेधार्थ मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत फैजपूर- यावल रोड वरती युवक काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 

मोदी सरकारची सुरू असलेली दडपशाही याच्या विरोधात घोषणाबाजी करत युवक काँग्रेसचे मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

 

राहुल गांधी यांनी संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती अडाणी यांच्यामध्ये नेमके कुठले संबंध आहेत..? तसेच उद्योगपती अदानी यांच्या कंपनीमध्ये आलेले वीस हजार कोटी रुपये नेमके कुणाचे..? यासंबंधीचे प्रश्न राहुल गांधी यांनी संसदेत उपस्थित करून भविष्यामध्ये मोदी सरकारला अडचणीत आणू शकत होते. परंतु त्या आधीच मोदी सरकारने दडपशाही करत एका खोट्या गुन्ह्याखाली राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावत,  तात्काळ त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. राहुल गांधींचे वाढते वर्चस्व व राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांवरती मोदी सरकारकडे नसलेले कुठलेही उत्तर, या सर्व भीतीपोटी मोदी सरकारने दडपशाही करत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली.

 

परंतु देशातील व जिल्ह्यातील युवक स्वस्त बसणार नाही. राहुल गांधी यांची खासदारकी जरी रद्द झालेली असली तरी देशातील व जिल्ह्यातील प्रत्येक युवक काँग्रेसचा पदाधिकारी हा राहुल गांधी यांचा आवाज बनत चौका चौकात व रस्त्यांवर  आंदोलन करीत मोदी सरकारला नेहमी अदानी आणि मोदी यांच्या संबंधांबद्दल प्रश्न विचारात राहणार असा इशारा जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी बोलताना दिला.

 

यावेळी जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र मराठे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील, प्रशांत ओगले, धनंजय चौधरी, म्युझिक पटेल,डॉक्टर शोएब पटेल, इमरान खान, भूपेंद्र जाधव, मुनावर खान, आनंद पुरोहित, महेश पाटील आदी  युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Protected Content