जळगाव प्रतिनिधी । हाथरस येथील प्रकरणी कठोर शिक्षा व्हावी यासाठी जमाते-ए-इस्लामी हिंद संघटनेच्या महिला पदाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील हातरस येथील दलीत तरूणीवर झालेले अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपींना पकडून फाशीची शिक्षा करावी अशी मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घटनेचा तिव्र निषेध करण्यात आले. सर्व दोषींना फासावर लटकावण्याची मागणी शहरातील जमात-ए-इस्लामी हिंद च्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी महिला विंगची अध्यक्षा नसरीन मेहमुद खान, शबाना मुश्ताक शेख, शबाना समद, खुर्शीद शेख, निलोफर इकबाल, अमरीन शेख, अंजूम खान, फराह अब्दुल्ला, शबाना देशमुख आदी महिला उपस्थित होत्या.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3917927554901321/