पॅरिस/बाकू : वृत्तसंस्था । आर्मेनिया आणि अजरबैझानमधील युद्ध शमण्याची चिन्ह नाहीत आर्मेनियाविरोधात दहशतवादी संघटना आयएसने ३०० दहशतवादी पाठवले आहेत. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनीदेखील याला दुजोरा दिला आहे. आर्मिनियाने शस्त्रसंधीसाठीच्या चर्चेसाठी सहमती दर्शवली आहे.
आयएसच्या दहशतवाद्यांनी तुर्कीच्या मदतीने गजिआनटेपच्या मार्गे नागोना-काराबाखमध्ये प्रवेश मिळवला फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी ब्रसेल्समध्ये म्हटले की, तीनशेहून अधिक दहशतवादी अलेप्पो झोनमधून काढण्यात आले होते त्यांना तुर्कीच्या मार्गे नागोर्नो-कारबाखमधील युद्ध सुरू असल्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. हे दहशतवादी अजरबैझानच्या बाजूने युद्धात उतरणार आहेत. या लोकांची ओळख पटवली असून हे सर्वजण आयएसशी संबंधित असल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले.
इमॅन्युअल मॅक्रॉन म्हटले की, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनीही आपल्याला ही माहिती मिळाली असल्याचे सांगितले. नाटो सदस्य म्हणून तुर्कीने उचललेले पाऊल चुकीचे असून त्याची घृणा वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असणाऱ्या पाकिस्तानने आणि तुर्कीने आर्मेनियासोबतच्या युद्धासाठी सैन्य, दहशतवादी पाठवले असल्याची चर्चा आहे. आता फ्रान्सने त्याला आता अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे. या युद्धात गृहयुद्ध सुरू असलेल्या सीरिया आणि लीबियातून दहशतवादी नागोरनो-काराबाख येथे पाठवण्यात आले आहेत. युद्ध करण्यासाठी दहशतवाद्यांना मोठी रक्कम दिली जात आहे.
तुर्कीने घेतलेल्या या निर्णयामुळे तणावात आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे आता रशिया आणि तुर्कीमध्येही युद्ध होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने या दहशतवाद्यांना एकत्रपणे अजरबैझानमध्ये पाठवले आहे. पाकिस्तानी सोशल मीडियातही अजरबैझानच्या समर्थनात मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात आहे.