Home धर्म-समाज मराठा महासंघ यावल शहर युवक अध्यक्षपदी चेतन पाटील

मराठा महासंघ यावल शहर युवक अध्यक्षपदी चेतन पाटील

0
36

यावल, प्रतिनिधी | अखिल भारतीय मराठा महासंघाच्या यावल शहर युवक अध्यक्षपदी चेतन अशोक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

अखिल भारतीय मराठा महासंघाची यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. मनोज पाटील यांच्या उपस्थितीत संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या यावल तालुका कार्यकारिणीची जाहिर कारण्यात आली. यात तालुका कार्याध्यक्षपदी गिरीष पाटील, यावल शहराध्यक्षपदी भूषण खैरे , यावल शहर युवक अध्यक्षपदी चेतन पाटील यांच्यासह लखन पवार, मयुर पाटील, स्वप्नील कोलते, रणधीर पाटील, आशुतोष पाटील, गोपाल कोलते, विजय इंगळे, भूषण अहिरे, निलेश भोईटे, रितेश पाटील, आकाश जाधव , राकेश शिर्के आदींना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. त्यांना मान्यवरांनी शुभेच्छा देत पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिले आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गटनेते अतुल पाटील, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष तथा आशीर्वाद फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील, मराठा महासंघाचे जिल्हा सरचिटणीस दीपक पाटील, मराठा महासंघाचे यावल तालुकाध्यक्ष विक्की पाटील, नगर परिषदचे नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. देवकांत पाटील आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound