यावल शहरासह तालुक्यातील ११ गावात ११० दुर्गोत्सव मंडळातर्फे शांततेत विसर्जन

 

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील ४२ तर यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागातील ६८ अशा ११० सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळा कडून गुरुवारी नवदुर्गेस पारंपारिक वाद्य वृंदाच्या गजरात बेधुंद नृत्य करीत युवा वर्गाने निरोप दिला आहे.

आज दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळ पासून मोठ्या उत्साहात व शांततेच्या वातावरणात विसर्जन मिरवणुकीस सुरवात होत, रात्री उशिरापर्यंत नवदुर्ग चे शांततेत विसर्जन करण्यात आले.

शहरातील ४२ दुर्गोत्सव मंडळांनी नवदुर्ग उत्सव साजरा केला या सार्वजनिक मंडळांसह तालुक्यातील यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किनगाव २३, चुंचाळे ३, चितोडा ३, शिरसाड ५, सावखेडासिम ३, महेलखेडी २, बोरावल खुर्द १, डोंगरकठोरा ४, नायगाव ८, दहिगाव १४ व गिरडगाव १ सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांनी नवरात्री उत्सवाची आज उत्साहात सांगता केली.

संपुर्ण नवरात्री उत्सव काळात उत्साहात आई दुर्गेची आराधाना, पुजा , गरबा,दांडीया उत्साहात पार पडली गुरूवारी एकादशी असल्याने काही गावात विसर्जन शुक्रवारी करण्याचा निर्णय मंडळाने घेतलाआहे. दुर्गामातेचे विसर्जन शांततेत व उत्साहात व्हावे यासाठी तत्पुर्वी येथील पोलीस ठाण्याच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी शांतता कमिटी सदस्य व संबंधित प्रशासन यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती.

विसर्जन मिरवणुकी दरम्यान, शांतता कमिटी सदस्य विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचे सह यावलचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर , सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोदकुमार गोसावी, पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, पोलीस उपनिरिक्षक सुदाम काकडे , सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे , सहाय्यक फौजदार अजीज शेख, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान पठान सह सर्व पोलिस कर्मचारी व होमगार्ड बांधवांनी संपुर्ण विसर्जन मिरवणुकीत चोख बंदोबस्त राखला.

Protected Content