यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक खासगी तर ९२ सार्वजनिक गणेश मंडळ मिळून एकूण ९३ मंडळाच्या गणरायाचे जल्लोषात करण्यात येत आहे.
यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक मंडळाच्या कार्यक्रर्त्याकडून मंडळा उंच व आकर्षक मूर्ती ढोल ताशांच्या गजरात शहरात येत होत्या. पोलिस प्रशासनाने गृहरक्षक दलाच्या जवानांसह पोलिसांचे बंदोबस्त नियोजन विभागीय पोलीस अधिकारी डॅा. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल चे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोदकुमार गोसावी ,पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर सज्ज झाले आहे.
येथे शहरात बालसंस्कार विद्यामंदिर या खासगी गणेश मंडळासह २० सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना होत आहे. याशिवाय ग्रामीण भागात विविध गावात ७२ मंडळात श्रींची स्थापना होत आहे. येथे शहरात पाचव्या दिवशी म्हणजे रविवार ४ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक आहे. येथे तारकेश्वर महादेव मंदिराजवळ पालिकेच्या वतीने कुंड उभारण्यात आले असून त्यात सार्वजनिक मंडळे श्रींचे विसर्जन होईल.
याच दिवशी नायगाव येथे एक, कोरपावलीचे ४, डांभूर्ण-६ , दहिगाव- ३, साकळी -३, सौखेडासीम -१, येथील गणेश मंडळांचे विसर्जन पाचव्या दिवशी होत आहे. सातव्या दिवशी ६ सप्टेंबर रोजी किनगाव ५, अट्रावल- ६, निमगाव- २, आडगाव- २, मोहराळे- ७ असे मंडळाचे विसर्जन होणार आहे. तर नवव्या दिवशी ८ सप्टेंबर रोजी सातोद- १, थोरगव्हाण- २, चिंचोली-४ आणि अनंत चतुर्दशीला गिरडगाव- १, सांगवीबुद्रुक-६, चितोडा-४, डोंगरकठोरा-७, अंजाळे- ४, टेंभी-१, राजोरा- २ येथील मंडळाचे विसर्जन होईल.