Home धर्म-समाज यावल शहरात ई श्रम कार्ड नोंदणीस उत्तम प्रतिसाद

यावल शहरात ई श्रम कार्ड नोंदणीस उत्तम प्रतिसाद

0
28


यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथे डॉ. कुंदन फेगडे यांच्या संपर्क कार्यालय येथे ई -श्रम कार्ड नोंदणी अभियानाचे कामगार पंधरवड्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीतर्फे आयोजन करण्यात आले होते.

 

डॉ.कुंदन फेगडे यांच्या सहकार्याने यावल शहरात ई -श्रम कार्ड नोंदणी अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाचा यावल शहरातील नागरिकांनी लाभ घेतला. नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा याकरिता श्रमजीवी कुटुंबास ई -श्रम कार्डची मोफत नोंदणी अभियान घेण्यात आले. या अभियानास एकूण १८७ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी अभियानाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष विजय मोरे होते. याप्रसंगी यावल तालुका भाजपा अध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, डॉ. कुंदन फेगडे, अतुल भालेराव, भूषण फेगडे, यावल शहर युवा मोर्चा अध्यक्ष रितेश बारी, उपअध्यक्ष मनोज बारी, शेखर बाविस्कर, यावल शहर युवा मोर्चा सरचिटणीस सिद्धांत घारू, प्रथमेश घोडके, सागर लोहार, विशाल बारी, दिपक फेगडे, शुभम सोनवणे, चेतन कापुरे आदींची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound