यावल, प्रतिनिधी ।नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील हायमास्ट पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासुन बंद असल्याने या प्रकारामुळे प्रभाग क्रमांक ३ मधील आयशानगर आणि खिरनीपुरा परिसरातील नागरीकांची मोठी गैरसोय होत असून हे पथदिवे त्वरित दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी आयशा नगरमधील काही समाजसेवी युवकांनी मुख्याधिकारी बबन तडवी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नातुन व निधीतुन यावल नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील आयशानगरमधील फातेमा मस्जिदजवळ तथा भुसावळ टी पांईट तसेच खिरनीपुरा बुरुज चौक या सार्वजनिक ठिकाणच्या परिसरातील देखील असलेले हाईम्सट पथदिव्य मागील ७ ते ८ महीन्यांपासुन बंद अवस्थेत आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरीकांनी नगर परिषदेकडे वारंवार तक्रार करून देखील उपयोग होत नसल्याने अखेर आज आयशानारमधील राहणाऱ्या युवकांनी हे पथदिवे त्वरित दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी केली आहे. निवेदनावर अश्पाक शाह हाजी गफ्फारशाह, नजीब शेख, उमरे खान, शेख नदीम, राजीक रमीज पटेल , शेख सलीम टेलर, इमरान शेख पहेलवान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
https://www.facebook.com/508992935887325/videos/913220586151548