यावल प्रतिनिधी । शहरातून जाणाऱ्या बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर या मार्गावरील रस्त्यावर बेकायदेशीर रित्या अतिक्रमण करणाऱ्या व्यवसायिकांना आठ दिवसांची मुदत दिली असून आठ दिवसाच्या आत सर्व अतिक्रमण काढण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
शहरातून गेलेल्या बुऱ्हाणपूर व अंकलेश्वर महामार्गावरील काही व्यवसायिकांनी अतिक्रमण करत दुकाने थाटली आहे. रोडाच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण करून रस्त्याची रूंदी कमी झाली आहे. रोडाच्या दोन्ही बाजूस पक्के व कच्चे रस्ते तयार करण्यात आले आहे. त्यामुळे प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी बेकायदेशीररित्या अतिक्रमण करणाऱ्या व्यवसायिकांना आठ दिवसाच्या आत अतिक्रमण काढण्यात यावे अशी नोटीसा बजावल्या आहेत. किंवा काही म्हणणे असल्यास किंवा कागदोपत्री पुरावा असल्यासे सादर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. नुकसान भरपाई देखील करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान या मार्गावरील अनधिकृत अतिक्रमण हे पुर्वी यावल तहसीलला तहसीदार म्हणुन व या वेळेस विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या कार्यकाळात ६ वर्षापुर्वी २०११ते २०१४ वर्षीच्या या कार्यकाळात मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले होते. यामुळे सदरच्या अतिक्रमणा विषयी प्रांत अधिकारी कैलास कडलग यांचा दांडगा अनुभव व निर्णय घेण्याची क्षमता यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न आता कायमचा मार्गी लागणार असल्याचे मत नागरीकांकडून होत आहे.