यावल प्रतिनिधी । येथील हिंदु मुस्लीम एकता मंचतर्फे कोरोना विषाणू प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली असून या संचारबंदीच्या काळात मोलमजुरी करून आपल्या पोटाची खळगी भरणारे कुणीही गोर गरीब नागरिक उपाशी राहून या सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून मागील सात दिवसा पासून रोज संध्याकाळी गोरगरीब नागरिकांना घरपोच जेवण वाटप करण्यात येत आहे.
आज प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व यावल तहसिलदार जितेंद्र कुवर, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील पोलिस स्टेशनच्या परिसरात या मान्यवरांच्या उपस्थिति राहून हिंदू मुस्लीम एकता मंचाच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले व त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शहरांतील या गोर गरीब वस्ती मध्ये दर रोज संध्याकाळी जेवण वितरित करण्यात येत आहे. यात श्रीराम नगर,पंचशील नगर, आझाद नगर,गोळीबार परिसर, बाबा नगर,सईद पुरा, कुंभार खंड, ईसलामपुरा, बाबुजीपुरा, प्रताप नगर, खिरनिपुरा, सुंदर नगरी, शिवाजी नगर, भिलवाडी, डांगपुरा अकसा नगर अदीवाड्यात हिंदु मुस्लीम एकता मंच तर्फे जेवण वाटप करण्यात येत आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कदीर खान,राजेश करांडे,नेहाल सर,चेतन पाटील, दिवाकर फेगडे, अजहर शेख, अस्लम सर,ईकबाल खान,अकिल अहमद,कलीमोधीन शेख,चेतन करंडे,जुबेर सर हाफिज खान,ईरफान शेख,शोएब अहमद, उस्मान खान, परंजल सोनवणे, खुशाल करांडे,अ.नबी, हर्षल पाटील, अक्रम पटेल आदी परिश्रम घेत आहेत.