यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने शाळेत सामुहिक राष्ट्रगीत, प्रभातफेरी व वृक्षारोपण यांसह विविध कार्यक्रमांबाबत नगरपरिषदेत बैठक आयोजित करण्यात आली होती.
या पार्श्वभुमीवर यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी बैठकीत दिल्यात सुचना. यावल नगर परीषद मध्ये घेण्यात आलेल्या या बैठकीत शहरातील शाळा, विद्यालय मुख्यध्यापक, शिक्षकांची बैठक शहरातील प्रत्येक शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त सामुहिक राष्ट्रगीत, जनजागृती करीता शहरात प्रभात फेरी व शाळेच्या आवारात वृक्षरोपण व्हायलाच पाहिजे व त्यांचे संगोपन केले गेले पाहिजे अशा सुचना मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी केल्या ते यावल नगर परिषदेमध्ये घेण्यात आलेल्या शहरातील शाळा, विद्यालय शिक्षकांच्या बैठकीत बोलत होते.
शहरातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या प्राचार्य मुख्यध्यापक, शिक्षक व पदाधिकारी यांची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी शहरात सवतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना प्रत्येक शालेय स्तरावरील उपक्रम हे उत्साहात घेतले गेले पाहिजे यात प्रामुख्याने सामीहिक राष्ट्रगीत सह शहरातील जनजागृती करीता रॅली सक्षम रित्या काढावी व शाळेच्या आवारात वृक्षरोपण करून त्यांचे योग्य संगोपनाचे नियोजन करावे अशा सुचना त्यांनी बैठकीत केल्या.
या बैठकीमध्ये साने गुरूजी विद्यालयाचे मुख्यध्यापक एम. के.पाटील, बाल संस्कार शाळेचे अतुल गर्गे,सरस्वती विद्या मंदिरचे मुख्यध्यापक जी. डी. कुळकर्णी, माध्यमिक कन्याशाळेच्या मुख्यध्यापिका नलीनी पाटील, मुलींचे विकास विद्यालयाच्या मुख्यध्यापिका निशा पाटील, इंदिरा गांधी उर्दु गर्ल्स हायस्कुलचे मुख्यध्यापक ए.के.सैय्यद,डॉ. जाकीर हुसेन उर्दु हायस्कुल व माध्यमीकविधालयाचे चे प्राचार्य जी. एन. खान यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
अशा उपक्रमांचे नियोजन
शहरातील प्रत्येक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतुन दिनांक ८ ऑगस्ट रोजी शहरात जनजागृती पर प्रभात फेरी काढली जाईल, दिनांक ९ ऑगस्ट रोजी शालेय स्तरावर सामुहिक राष्ट्रगीत गायन केले जाईल तर वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदींचे नियोजन करण्यात आले आहे.