यावल येथे सामान्य ज्ञान स्पर्धला उत्तम प्रतिसाद

 

यावल : प्रतिनिधी । विरावली येथील छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन संचलित संकल्प करिअर अकॅडमीकडून यावल येथे आज सामान्य ज्ञान सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते १५० स्पर्धकांनी  सहभाग घेतला

 

यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थीनींना सन्मानपत्र आयोजकांच्या हस्ते वितरण करण्यात आले, प्रमुख पाहुणे  म्हणून आमदार शिरीष चौधरी यांचे चिरंजीव धनंजय चौधरी व छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनचे अध्यक्ष  अॅड देवकांत पाटील , कोरवापलीचे  सरपंच विलास अडकमोल उपस्थित होते .

 

बक्षीस वितरणापूर्वी  अॅड . देवकांत पाटील व धनंजय चौधरी यांनी  विद्यार्थांना मार्गदर्शन करून करिअर अकॅडमीला मदती साठी नेहमी तत्पर राहू असे आश्वासन दिले अकॅडमीचे संचालक बादल तायडे (राष्ट्रीय खेडाडू ) मुंबई पोलीस यांचे या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत अल्पशा: फी मध्ये उपक्रम  राबवत असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक बादल तायडे , सावन तायडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.  संचालक बादल तायडे यांनी आभार मानले .

 

Protected Content