*यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | येथील जुन्या भालशिव रस्त्यालगत असलेल्या शेतशिवारातून शेतकऱ्यांच्या ६० हजार रुपये किंमतीच्या दोन विद्युतवरील पाण्याची मोटार चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
यावल येथील शेतकरी डॉ. सतीश सुपडू व गोपाळ तोताराम कोळी यांची जुन्या भालशिव रस्त्यालगत शेती आहे. दरम्यान शेतातील विहिरीवरील सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या दोन विद्युत मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २८ फेब्रुवारीच्या रात्री घडली आहे. तत्पूर्वी या बाबतची पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की , येथील जुन्या भालशिव रस्त्यावरील डॉ.सतीश यावलकर यांचे शेत गट क्रमांक १४७० मधील विहिरीवरील सुमारे ३० हजार रुपये किमतीची टेक्समो कंपनीची विद्युत मोटर अज्ञात चोरट्यांनी मोटर सायकल वर टाकून चोरून नेली आहे. शेतात मोटर सायकलच्या चाकाचा चे ठसे उमटलेले आहेत. त्याच प्रमाणे, यावलकर यांचे लगतचे गोपाळ तोताराम कोळी यांचे शेतातील साडेसात हॉर्सपॉवरची विद्युत मोटर २८ रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. डॉ. सतीश यावलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार असलम खान पुढील तपास करीत आहे