यावल येथे विविध योजनांचे धनादेश व दाखल्यांचे आ. शिरीष चौधरी यांच्याहस्ते वितरण

यावल प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयात महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने महाराजस्व अभियानाअंतर्गत कुटुंब अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत धनादेश, मतदान ओळखपत्र,जातीचे दाखले, शिधापत्रीका, उत्पन्नाचे दाखल्यांचे आ. शिरीष चौधरी यांच्याहस्ते वितरण करण्यात आले.

अभीयानाची सुरुवात मान्यवरांच्याहस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली . यावल येथील तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत आज ६ फेब्रुवारी रोजी महाराजस्व अभीयानाअंतर्गत विविध प्रकारच्या दाखल्यांच्या वितरणाचे कार्यक्रमात आमदार तथा प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, जि.प. गटनेते प्रभाकर सोनवणे, जि.प.सदस्य आर.जी. पाटील, पं.स. माजी सभापती लिलाधर चौधरी, यावल पं.स.चे गटनेते शेखर सोपान पाटील , कृउबा चेरअमन तुषार पाटील, इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील , काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, नगरसेवक मनोहर सोनवणे , तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह यांच्यासह आदी मान्यवर मंडळी या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होती.

 या महाराजस्व अभीयांना अंतर्गत संपन्न झालेल्या कार्यक्रमाची प्रस्तावना तहसीलदार महेश पवार यांनी केली तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हिंगोणा येथील तलाठी दिपक गवई यांनी केले उपस्थितांचे आभार निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांनी मानले.       

या दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील कमावीते व्यक्तिचा मृत्यु झालेल्या या १५ लाभार्थ्यांना मिळाले राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना योजनेअंतर्गत विस हजार रूपयांचे धनादेश आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते निलोफर हकीमोद्दीन शेख ( यावल ) ,मिनासातिष पाटील (यावल ), गजाला शेख शकील (यावल), रेखा वारके (न्हावी प्रगणे यावल) , रेखा मोरे (फैजपुर), संगीता मोरे (न्हावी प्र. यावल) , प्रमिला बाळु तायडे (कासवे) , उषा जगन सपकाळे (कासवे) , सिमा जितेन्द्र केदारे (अट्रावल) , कल्पना सुभाष चोपडे ( लोद ) ,मिनाबाई सुरेश कोळी (अट्रावल) या सर्व लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने ३ लाखाचे धनादेश वाटप करण्यात आलीत.

 

Protected Content