यावल येथे वारंवार एकाच रस्त्यावर लाखोंचा निधी खर्च होत असल्याची तक्रार

yawal nivedan

यावल, प्रातिनिधी | शहरात बोरावल गेट ते रेणूकादेवी मंदिर या रस्त्याचे काम सुरू होत असून रस्त्यावर रस्ता तयार केल्यास त्याची उंची वाढून रस्ता उंच होवून रस्त्यालगतची घरे ठेंगणीअसल्याने पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरेल, त्याकरीता नगर परिषदेने हा रस्ता तयार करतांना आधीचा रस्ता खोदून त्यावरून नवा रस्ता तयार करावा. अशी मागणी करणारे निवेदन आज (दि.३०) नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.

 

या मागणीसाठी शहरातील बसमळा परिसरातील नागरिकांनी आज नगर परिषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन सादर केले. दरम्यान, रस्ता खोदून त्यावरून नविन रस्ता तयार करण्यासाठी खर्च खूप लागतो आणि एवढा निधी पालिकेकडे उपलब्ध नसल्याचे सांगुन नागरिकांचा जर या रस्ता उभारणीस विरोध असेल तर सदर रस्ता उभारणीचे काम स्थगीत केले जाईल. असे नगर परिषदचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी निवेदन घेऊन आलेल्या नागरिकांशी बोलतांना स्पष्टपणे सांगितले.

या निवेदनानुसार गेल्या १५ वर्षात पाचव्यांदा येथे नविन रस्ता तयार करण्यात येत असल्याने तो खुपच उंच झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. निवेदन सादर करताना नंदा महाजन, व्ही.डी. कोळी, बी.डी. कोळी, पियुष देशमुख, पंकज भगवान आदी उपस्थित होते. निवेदनावर राजेंद्र महाजन, रमेश चौधरी, विष्णू महाजन, जे.ए. पाटील, जे.एस. चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content