यावल येथे लोकमतचे डी. बी. पाटील सन्मानीत

यावल, प्रतिनिधी । कोरोना आजाराच्या संसर्ग कालावधीत या आजाराविषयी ज्यांनी आपल्या लेखणीतून जनजागृती करून योगदान दिले अशा तालुक्यातील पत्रकार बांधवांना महसुल प्रशासनाच्या माध्यमातुन प्रांत अधिकारी डॉ .अजीत थोरबोले यांच्या पुढाकाराने सन्मानपत्र देवुन सन्माननित करण्यात आले असून याअंतर्गत लोकमतचे तालुका प्रतिनिधी डी. बी. पाटील यांना सन्मानित करण्यात आले.

यावलच्या तहसील कार्यालयातील सभागृहात आज १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार जितेन्द्र कुवर हे होते तर निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार तसेच यावल पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण आदी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.

यावेळी कोरोना विषाणु महामारीच्या आपत्तीमध्ये सामाजीक बांधीलकी जपत आपल्या निर्भीड लेखणीतुन संकटात जनजागृती करण्यासाठी व कोरोना विरूद्धचा लढा जिंकण्यासाठी जिव धोक्यात घालुन कार्यकेल्याबद्दल लोकमतचे तालुका प्रतिनिधी डी. बी. पाटील यांचा तहसीलदार जितेन्द्र कुवर व प्रभारी पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्रे देवुन सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांनी मानले .

या कार्यक्रमात डी. बी. पाटील यांच्यासह यावल तालुक्यातील पत्रकार राजु कवडीवाले, पत्रकार अय्युब पटेल , पत्रकार शेखर एच .पटेल, पत्रकार तेजस यावलकर , पत्रकार ए टी चौधरी पत्रकार महेश पाटील , अरूण पाटील , पराग सराफ, रवीन्द्र कोलते , शब्बीर खान , याकुब पिंजारी , पत्रकार सुनिल गावडे ,सुनिल पिंजारी , मनोज नेवे, जिवन चौधरी , हर्षल आंबेकर , रणजित भालेराव , नितिन झांबरे , ज्ञानदेव मराठे यांनाही याप्रसंगी सन्मानपत्र देण्यात आलीत.

Protected Content