यावल प्रतिनिधी । केंद्रीय मंत्री मिश्रा यांच्या मुलाच्या वाहनाने आंदोलनकर्ता शेतकऱ्याला चिरडल्याची घटनेच्या निषेधार्थ उद्या सोमवारी ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले. या बंदला यावल तालुक्यातील व्यापारी व दुकानदारांनी सहकार्य करावे असे आवाहन यावल महाविकास आघाडीच्या वतीने आज रविवार १० ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील लखिमपूरा येथे केंद्र सरकार आणि योगी सरकारच्या विरोधात लखिपूर येथे शेतकरी आंदोलन सुरू होते. दरम्यान केंद्रीय मंत्री मिश्रा यांच्या मुलगा आंदोलनात वाहनाने शेतकरी आंदोलनाजवळ आले. पंरतू शेतकरी आंदोलन करत असतांना त्यांच्या वाहनाने एका शेतकऱ्याला धडक देत चिरडल्याची घटना घडली. या घटनेचा देशात तिव्र पडसाद उमटले. याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने उद्या सोमवार ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हा पुकारले आहे. महाराष्ट्र बंद ला यावल तालुक्यातील व्यापारी व दुकानदार यांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीचे आमदार शिरीष चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, शिवसेना तालुका प्रमुख रवि सोनवणे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले आहे.