यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तहसील कार्यालयात शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आ. शिरीष मधुकरराव चौधरी यांच्याहस्ते धनादेश वितरीत करण्यात आले.
यावल तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील कमाविती व्याक्ती मरण पावल्याने निराधार झालेल्या कुटुंबास शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आर्थिक मदत करण्यात येते. यावलच्या तहसील कार्यालयातील सभागृहात रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरिष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या तालुका समन्वय समितीच्या पहील्या बैठकीत आमदार चौधरी यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी २२ लाभार्थ्यांना २० हजार रूपये प्रमाणे ४ लाख ४० हजार रूपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले. याप्रसंगी बैठकीस संजय गांधी समितीचे तालुकाध्यक्ष शेखर सोपान पाटील, समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, तहसीलदार महेश पवार, पोलीस निरीक्षक अतिश कांबळे, समन्वय समितीचे सदस्य प्रा. मुकेश येवले, रविंद्र सोनवणे, लिलाधर चौधरी, नितिन चौधरी, सदस्या जयश्री पाटील, ललीता चौधरी, प्रेरणा भंगाळे, यावल खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरूड, निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, नायब तहसीलदार आर. डी. पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते.