यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील तालुका शिवसेना, शहर शिवसेना व युवा सेना यांच्या वतीने माजी मंत्री रामदास कदम व शहाजी पाटील यांनी केलेल्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबाविषयी गैरव्यक्तव्याचा निषेर्धात आज यावल निषेध करुन जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
आज सकाळी पंचायत समिती यावल पासुन भुसावळ टि पॉईट पर्यंत शिवसेना तालुका प्रमुख रविन्द्र सोनवणे, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, तालुका उपप्रमुख शरद कोळी, जिल्हा उपसंघटक माजी नगरसेवक दिपक बेहडे यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य शिवसेनीकांच्या उपस्थित मोर्चा काढण्यात येवुन शिवसेनेतुन गेलेले गद्दार रामदास कदम व शहाजी पाटील यांनी सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबा बद्दल अपशब्द वापरले त्यामुळे संत्पत शिवसेनिकांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात येवुन त्यांच्या प्रतिमेस काळे पासण्यात आले. रामदास कदम यांचा विरूद्ध घोषणा देत जाहीर निषेध करण्यात आले.
यावेळी सेनेचे शहर उपप्रमुख संतोष धोबी, शिवसेनेच्या आदीवासी सेलचे तालुका प्रमुख हुसैन तडवी, युवा सेनेचे सागर देवांग, शाखाप्रमुव शकील पटेल, डॉ. विवेक अडकमोल, तन्वीर पटेल, तौसीफ पटेल, शिवाजी पाटील, किनगाव सेनाप्रमुख एल. व्ही. पाटील, हेमंत पाटील, पिन्टु कुंभार, इलयास शेख, मोहम्मद असलम मोहम्मद जमील, संतोष वाघ, प्रविण लोणारी, योगेश चौधरी, योगेश पाटील, ईस्माईल तडवी, जिवन कोळी, न्याजो६ीन तडवी, सुनिल बारी , प्रकाश वाघ, नाना पाहील, विजय पाटील यांच्यासह मोठया संख्येत शिवसैनिक उपस्थित होते.