यावल प्रतिनिधी । शहरातील खिर्णी पुरा भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एकास घेतले ताब्यात १ हजार ८२० रूपये किंमतीचा मांजा केला जप्त करण्यात आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खिर्णी पुरा भागात नायलॉन मांजा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने असलम टेन्ट हाऊस येथून 1820 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे या प्रकरणी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या शेख असलम शेख जहिरोद्दीन याचे विरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे