यावल येथे मध्यरात्री तीन मोबाईलसह रोकड लंपास; दोघांवर गुन्हा

यावल प्रतिनिधी । घरात कोणीही नसतांना गावातीलच दोघांनी घरात घुसून तीन मोबाईल व रोकड अशी एकुण ३१ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार घटना तालुक्यातील निमगाव येथे आज सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी यावल पोलीसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी संजय चंद्रकांत तायडे (वय-४२) रा. निमगाव ता. यावल यांच्या घरात ठेवलेले प्रत्येकी ८,५००, ७,५००, ९,५०० रूपये किंमतीचे तीन मोबाईल आणि ७ हजार ५०० रूपये रोख असा एकुण ३१ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल १४ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गावातील राहणारा संशयित आरोपी आशिष विलास तायडे रा. निमगाव आणि त्याच्या सोबत असलेला एक अनोळखी व्यक्ती यांनी चोरून नेली अशी फिर्याद यावल पोलीसात दिली. याप्रकरणी दोघांविरोधात यावल पोलीस ठाण्यात चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अशोक जवरे करीत आहे.

Protected Content