यावल प्रतिनिधी । शहरातील एका बँकेतील कर्मचारी भुसावळ शहरातील असल्याने तो कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आल्याने त्यालाही कोराना झाल्याची अफवा यावल शहरात फिरत आहे. त्या कर्मचाऱ्याला होम क्वारंटाईन करण्यात आले असून कोरोना विषाणूसंदर्भात सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा देखील सुरू आहे.
भुसावळ शहरात मागील दोन दिवसात कोरोना संसर्गात वाढ झाल्याने भुसावळ शहराला जोडणाऱ्या सर्व सीमा बंद करण्यात आल्याने यावल येथील एका बँकेत काही कर्मचारी भुसावळचे असल्याने व्यक्ती बँकेत पोहचू शकत नाहीत त्यामुळे मोजक्याच कर्मचाऱ्यावर बँकेचे व्यवहार सुरू आहेत. त्यातच बँकेचा एक कर्मचारी भुसावळ येथे राहत असलेल्या इमारती मध्ये राहणाऱ्या एका व्यक्ती हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आल्याने ती संपूर्ण इमारत कोरेनटाईन करण्यात आल्याने त्यात राहणारे बँकेचे कर्मचारी हे कोरोना रुग्ण असल्याचे होम कोरंटाईन करण्यात आलेल्या बातमी च्या अफवांमुळे शहरासह परीसरात मात्र उलट-सुलट चर्चेला उधान आले होते.
तालुक्याच्या लगत असलेल्या भुसावळ शहरात कोरोना संसर्गात वाढ झाल्याने व भुसावळ शहराच्या सीमा बंद असल्याने येथील एका बँकेत नोकरीस असलेले काही कर्मचारी बँकेत येवू शकले नाहीत त्यातील एका कर्मचारी भुसावळ येथे ज्या इमारतीत राहत आहे. ती इमारतीतील एक कोरोना संशयीत रुग्ण आढळल्याने ती इमारत सील करण्यात आली. त्यामुळे एक कर्मचारी होम क्वारंटाईन करण्यात आला आहे. शहर व पपरीसरात मात्र उलट-सुलट चर्चेला उधान आले होते, असे बँक व्यवस्थापक एफ. आर. डीकु्रझ यांनी सांगीतले. मंगळवारी बँक सॅनेटाईझेशन करण्यात आली असून बँकेतील व्यवहार हा सोशल डिस्टन्सिंग नुसार होत आहे.