यावल प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ जयंती कोरोना विषाणू संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अतिशय काटेकोर पालन करीत अत्यंत साध्या पद्धतीने यावल येथे साजरी करण्यात आली.
याप्रसंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र आदरांजली वाहिली. यावल शहरासह तालुक्यात प्रथमच कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर येथील सिद्धार्थनगर व पंचशील तरुण मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे नियम अगदी साध्या पद्धतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव यावल शहरातील बुरुज चौकात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस काही मोजक्या भीमसैनिकांनी अतिशय शिस्तबद्ध मार्गाने उपस्थित राहून भावपूर्ण आदरांजली वाहिली.
यावेळी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, पो.पा. मिलिंद गजरे, नगरसेवक मनोहर सोनवणे, काँग्रेसचे कार्यकर्ते अनिल जंजाळे, सामाजिक कार्यकर्ते अयाज खान, हाजी शब्बीर खान यांच्यासह डॉ.बाबासाहेब उत्सव समितीचे अध्यक्ष प्रदिप गजरे, उपाध्यक्ष विनोद सोनवणे, खजिनदार विकी गजरे, सचिव बबलू गजरे, सहसचिव गौतम गजरे, संतोष गजरे यांच्यासह आदींनी उपस्थिती होती.