यावल येथे जागतिक महिला दिवस उत्साहात

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |    जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे विद्यार्थी विकास विभाग राष्ट्रीय सेवा योजनाआणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.

 

हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. महाविद्यालयातील महिला प्राध्यापिकांचा महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. उपप्राचार्य प्रा. एम.डी.खैरनार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते उप प्राचार्य प्रा. ए पी पाटील यांनी महिला दिन साजरा करण्यामागील भूमिका व पार्श्वभूमी विषयी मार्गदर्शन करत आजपर्यंतच्या इतिहासातील आदर्श स्त्रियांचा दाखला देत आज एकविसाव्या शतकात महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही असे विशद केले.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. एम. डी. खैरनार यांनी राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाई आंबेडकर यांचा आदर्श महिलांनी घेऊन तसेच कामगार चळवळीतून आंदोलन उभारणार्‍या क्लारा झेड स्किन यांनी महिलांसाठी कार्य करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. समाज सुधारकांच्या प्रयत्नातून १९१० मध्ये ठराव होऊन महिला दिन साजरा केला जातो. असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश जाधव व आभार प्रदर्शन डॉ. सुधीर कापडे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी डाॅ. पी. व्ही.पावरा,  डॉ.एच.जी.भंगाळे,प्रा. भारती सोनवणे, डॉ. निर्मला पवार, डॉ. वैशाली कोष्टी, प्रा. नरेंद्र पाटील, प्रा.सी.टी.वसावे, प्रा. धनश्री राणे आदींची उपस्थिती लाभली.

Protected Content