अ‍ॅड. भरत पवार सहकार्‍यांसह शिवसेनेत दाखल

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  येथील युवा सेना उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड. भरत पवार यांनी आपल्या सहकार्‍यांसह पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे हस्ते शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

 

याप्रसंगी अ‍ॅड. भरत पवार यांच्या सोबत उप तालुका प्रमुख सुनील अग्रवाल, युवा सेना उपतालुकाप्रमुख अभिषेक पाटील,बी.टी. संघटना तालुका अध्यक्ष हातिम तडवी, युवा सेना उपतालुकाप्रमुख विनोद राठोड, वीरेंद्र सिंग राठोड, शेतकरी सेना संघटक नेरी शाखाप्रमुख विश्वास सोनवणे, चिंचखेडा  शाखाप्रमुख बाळू जोशी, देऊळगाव गुजरीचे भिका गुरव यांचे सहअसंख्य शिवसैनिक यांनीही प्रवेश केला.

 

यावेळी  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, युवा उपजिल्हाप्रमुख स्वप्निल राजपूत उपस्थित होते. भरत पवार यावेळी म्हणाले की  कुठल्याही पदाची अपेक्षा न करता तालुक्यात पक्ष वाढविला. मात्र अलीकडे नव्यानेच काही पक्षात आलेल्या नवख्या कार्यकर्त्यांना पदे देऊन आमच्यावर अन्याय केला.  पैसे देऊन पद दिल्याचे लक्षात आल्यामुळे आम्ही पक्ष सोडत आहोत असेही ते म्हणाले.

Protected Content