यावल ( प्रतिनिधी) | तालुक्यातील किनगाव येथे शौचास बसलेल्या लहान मुलास दगड मारल्याच्या कारणावरून एकाच समाजातील दोन गटामध्ये वाद होवुन झालेल्या मारहाणीत दोन्ही गटाचे ८ जण जखमी झाले आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, किनगाव तालुका यावल येथे आज शनिवारी १८ मे रोजी सांयकाळी ५ ते ५.३० वाजेच्या सुमारास एक वयोवृद्ध व्याक्तिने लहान मुलाला गावाजवळ असलेल्या मालोद रस्त्याच्या कडेला शौचालया करीता घेवुन उभे असता दगड मारल्याचा जाब विचारण्यासाठी जहुर हमीद खाटीक वय ५८ वर्ष हे नईम गुलाब खाटीक वय २४ वर्ष, शोहेब शकील खाटीक वय २८ वर्ष, कय्युम गुलाब खाटीक वय ३७ वर्ष सर्व रा. किनगाव ता यावल यांना विचारण्यासाठी गेले असता दोन्ही गटात शाब्दीक चकमक झाल्यानंतर वाद वाढल्याने दोन्ही गटाकडुन एकामेकांवर दगडफेक करण्यात आल्याने यात जहुर हमीद खाटीक, सईद हमीद खाटीक, वहीद हमीद खाटीक, नईम गुलाब खाटीक, शोहेब शकील खाटीक, कय्युम गुलाब खाटीक, हबीब गुलाब खाटीक यांना डोक्यांना दगड लागल्याने सर्व जखमी झाले.
यातील तिन जणांना किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रावर वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल पाटील यांनी उपचार केले. तर इतरांना यावल येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अधिप्रचारीका शितल ठोबंरे यांनी तिन जणांचे उपचार करून त्यांना जळगाव येथे पुढील उपचारासाठी पाठविले आहे. यावल पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही गटाच्या एकमेकांची विरुद्ध तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.