चाकू भोसकून एकावर हल्ला; 6 जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी | दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केलेला आरोपी किरण शंकर खर्चे हा दुचाकीने जळगावात येत असताना सहा जणांनी त्याला जुन्या वादातून चाकूने भोसकल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली होती. या घटनेपूर्वी याच 6 संशयितांनी सुप्रिम कॉलनीतील आकाश दिपीप परदेशी या कामगारावर चाकून वार केले होते. तो जखमी असून या दोन्ही घटनेबाबत एमआयडीसी पोलिसात प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जखमी किरण खर्चे हा दोन वर्षकरिता हद्दपार असल्याने तो औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापूर येथे राहतो. 16 रोजी आई आजारी असल्याचा वडीलांचा फोन आला. त्यानुसार रात्री दुचाकी (क्र एम.एच 19 सी.एल 0557) ने जळगावकडे येत असताना गीतांजली केमीकल कंपनीसमोर येताच अचानक दुचाकीसमोर चारचाकी (क्र. एम.एच.19 सी.ए.0007) आडवी लावली. गाडीतून निलेश सपकाळे रा.जैनाबाद, अनिल घुले रा.रामेश्वर कॉलनी, राधे शिरसाठ रा.सुप्रीम कॉलनी, रुपेश सोनार रा.जैनाबाद, अमोल कोळी, विक्की पाटील यांनी जुन्या भांडणातून शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यात निलेश सपकाळे ने आज तुला संपवून टाकू असे म्हणज चाकू खर्चेच्या पोटात खुपसला व जखमी अवस्थेत सोडून संशयित पसार झाले. यात गंभीर दुखापत झाल्याने किरणला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्याच्या जबाबावरुन एमआयडीसी पोलिसात शनिवारी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक विशाल वाठोरे, सचिन मुंडे करीत आहेत. दरम्यान किरण खर्चे हा हद्दपार असताना विनापरवानगी जळगावात आल्याने त्याच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

Add Comment

Protected Content