यावल, प्रतिनिधी | येथील शहरातील सातोद कोळवद रोडवरील तहसील कार्यालयावर आज शुक्रवारी दिनांक १७ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता संविधान बचाव समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वधर्मीय नागरीकांसह महिलांचा मोठया प्रमाणावर सहभाग दिसुन आला.
दुपारी २ वाजेपासुन सातोद रस्त्यावर असलेल्या नविन तहसिल कार्यालयासमोरील शशीकांत सखाराम चौधरी कन्या शाळेच्या समोरील प्रांगणात आंदोलकांची येण्यास सुरवात झाली होती व तीन वाजेला येथे आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. यात सीएए, एनपीआर व एनसीआर कायदा रद्द करा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी फरहानाज, अॅड. नितीन रजाने, राष्ट्रवादीचे विजय पाटील, सैय्यद आसमा, हाजी शब्बीर खान, प्रदिप सपकाळे, सोहेल आमीन, मौलाना गुलाम अहेमद रजा,मो. हाजी याकुब शेख, सह मान्यवरांनी येथे आंदोलकांना संबोधीत करून मार्गदर्शन केले. यात सोहेल आमीन यांनी सांगीतले की, या देशातील स्वातंत्र्याच्या लढ्यात मुस्लिम बांधवांनी देखील बलीदान दिले आहे. तेव्हा आज त्यांच्याकडे पुरावे मागणे हा त्यांच्यावर हा एका प्रकारे अन्याय असल्याचे सांगीतले. याशिवाय इतर आंदोलकर्ते यांनी देशातील सध्याच्या एनआरसी आणी सिएए या केन्द्र शासनाने मंजुर केलेल्या अन्याय कारक कायद्या विरूद्ध आपली भुमिका स्पष्ट केली. सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास आंदोलनकर्त्यांचे शिष्ट मंडळ तहसिल कार्यालयात जावुन तहसिलदार जितेंद्र कुवर यांना सदरील कायदे रद्द करण्यात यावे याबाबत मागणीचे निवेदन देण्यात आले. हजारो नागरीकांच्या उपस्थित संपन्न झालेल्या या ठीय्या आंदोलनात मुस्लीम समाजाचे जेष्ठ सामाजीक कार्यकर्त हाजी शब्बीर खान, हाजी ताहेर शेख चाँद, शेख हकीम शेख अलाउद्दीन, काँग्रेसचे यावल तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे गटनेता प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, प्रमोद पारधे,सविधान बचाव समितीचे अनिल जंजाळे, पंकज तायडे, नगरसेवक मनोहर सोनवणे, गौतम अडकमोल, आताउल्ला खान, शेख आलीम शेख रफीक, शेख हकीम हाजी शेख याकूब, पंकज तायडे, शेख असलम शेख नबी, गौतम अडकमोल, शेख सईद शेख रशीद, बबलु तायडे,इकबाल खान रशीद खान, मो. शफी रफीयोद्यीन, शेख मजहर, इकबाल खान, मोहसिन खान गफुर खान, अजहर शेख सह संविधान बचाव समितीचे पदाधिकारी आणी कार्यकर्त् या प्रसंगी उपस्थिती होती.