यावल : प्रतिनिधी । मोदी सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्ते उद्या यावल येथे एका दिवसाचे उपोषण करणार आहेत .
केन्द्रातील मोदी सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात देशाचा अन्नदाता मागील १०० दिवसांपासुन दिल्लीच्या सिमेवर ठाण मांडुन आंदोलन करीत आहे या काळ्या कायद्यामुळे हमीभाव आणी शेतकऱ्यांच्या हक्काच्या बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार असुन, शेतकऱ्यांना भांडवलदाराचे गुलाम बनविण्याचा केन्द्रशासनाचा डाव आहे .
पेट्रॉल , डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढलेल्या किमतीच्या विरोधासह शेतकरी व कामगार विरोधातील कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सुमारे ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा दुदैवी मृत्यु झाला
२६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आंदोलक शेतकरी बांधवांना पाठींबा देण्यासाठी संपुर्ण देशात काँग्रेस कमेटीच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली राज्यांसह यावल तहसील कार्यालयासमोर कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालन करीत तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय उपोषण करण्यात येणार आहे .
https://www.facebook.com/508992935887325/videos/443428873594852