यावल प्रतिनिधी । बारावी परिक्षेत सानेगुरूजी उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९०.५३ टक्के लागला आहे. धनश्री फेगडे हिने ८८.७६ टक्के मिळाले असून यावल केंद्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला आहे.
अधिक वृत्त असे की, यावल नगरपरिषदेच्या साने गुरूजी उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल आज दुपारी जाहीर झाला. यात विद्यालयाचे ९९.९ टक्के निकाल लागला आहे. निकालानुसार केंद्र क्रमांक ८११ मधील विद्यालयाची विद्यार्थिनी धनश्री देविदास फेगडे हिने ८८.७६ टक्के गुण मिळवून संपूर्ण केंद्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला. शालांत परिक्षेचा विद्यालयाचा तिन्ही शाखांचा निकाल चांगला लागला असून यात विज्ञान शाखेचा निकाल ९९.१९ टक्के , वाणिज्य शाखेचा निकाल ९७.७० टक्के तर कला शाखेचा निकाल ७४.७१ टक्के असा लागलेला आहे.
शाखानिहाय निकाल याप्रमाणे
विज्ञान शाखा – प्रथम धनश्री देविदास फेगडे ८८ .७६टक्के, द्वितीय हत्तीवाले अंजली दिलीप ८८ टक्के तर तृतीय मानसी मनोज वारके ८६ टक्के. वाणिज्य शाखा – प्रथम मोरेकर सागर महेंद्र ७८.४६ टक्के, दुसरा चौधरी खुशबू भरत ७७.५ टक्के; तृतीय नेवे वैष्णवी शशिकांत ७४.७६ टक्के. कला शाखा- प्रथम बारी सोनिया विठ्ठल ७५.३८ टक्के, दुसरा बारेला गौरव अरुण ७४.३० टक्के, तृतीय पारधे रोहिणी सुधाकर टक्के ७३.५३ टक्के असे गुण मिळवून यश संपादन केले आहे.
सर्व शालांत परिक्षेतील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन यावल नगरीच्या नुतन नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान शालेय समिती अध्यक्ष अतुल पाटील, उपनगराध्यक्ष राकेश कोलते, शिक्षण समिती सभापती रुखमाबाई महाजन, यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी, नगरसेवक प्रा. मुकेश येवले, अभिमन्यू विश्वनाथ चौधरी, नगरसेविका रेखा चौधरी, कल्पना दिलीप वाणी, देवयानी धिरज महाजन यांनी त्यांचे मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. प्राचार्य सुरेश आर. वाघ, उपमुख्याध्यापक डी.एस. चोपडे, उपप्राचार्य ए.एस. इंगळे, पर्यवेक्षक एम .के. पाटील, पर्यवेक्षक एस.टी.ताडेकर, कार्यालयीन अधिक्षक नितीन बारी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतूक व अभिनंदन केले आहे.
=============
येथील कला वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयाचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला असुन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या घेण्यात आलेल्या शातांल परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आलेला असून यावल येथील ज. जि. म. वि. प्र.सह.समाज संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा निकाल विद्या शाखा निहाय खालीलप्रमाणे लागलेला आहे.
विज्ञान शाखातील एकूण 127 पैकी 121 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल 95. 27% लागला आहे. त्यात कु .मुस्कान संजय तडवी ही विद्यार्थिनी 84.46% गुण मिळवून प्रथम; तर द्वितीय क्रमांकाने कु . मुस्कानबी सलिम पटेल 83.68% मिळवून उत्तीर्ण झाली आहे .
कला शाखेत 96 पैकी 71 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण 73.95% निकाल लागलेला असुन या शाखेत प्रथम क्रमांकाने कु .डिंपल किशोर शेवाळकर हिने 74.46% गुण मिळविले. द्वितीय क्रमांक कु . अंजुम छब्बु तडवी हीने 70.30% मिळाले असुन. तर तृतीय क्रमांक अमोल ताराचंद राजपुत यास 68.46% मिळाले.
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमासाठी एकूण 51 पैकी 44 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 84.61% लागलेला आहे. प्रथम क्रमांक परदेशी अश्विनी अनिल 71.69% , द्वितीय क्रमांक साठे कोमल रमेश 71.53% तर तृतीय क्रमांक धनगर सोनाली संजय 67.07% गुण मिळवून उत्तीर्ण झाले. बारावीच्या शालांत परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, प्राचार्य, उपप्राचार्य व प्राध्यापक बंधू-भगिनींनी अभिनंदन केले.