यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगर परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीला आली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सागर बापू पाटील (वय-३०) रा. शिवाजी नगर, यावल असे मृत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सागर पाटील हा त्याची पत्नी व मुलगा याच्यासह वास्तव्याला आहे. रविवारी १७ जुलै रोजी पत्नी ही शेतात गेली होती. तर मुलगा शिकवणीला गेला होता. त्यामुळे बापू पाटील हे घरी एकटे असतांना दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरात कुणी नसतांना घरातील छताला दोरी बांधुन गळफास घेवून आत्महत्या केली. सागरची पत्नी दुपारी शेतातून कामावरून घरी आल्यावर घराचे दार उघडवावर सागर हा गळफास घेतलेल्या दिसून आले. पतीचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. परिसरातील राहणाऱ्या तरूणांनी धाव घेवून तातडीने यावल ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन देशमुख यांनी मयत घोषीत केले.
मयत तरूण सागर हा यावल येथे बसस्थानजवळील एका बॅटरीच्या दुकानावर कामास होता. मी घरून जेवण करून येतो असे तो दुकान मालकास सांगून गेला होता. मयत सागर यास पत्नी आणि एक चार वर्षाचा मुलगा आहे .