यावल महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन            

 

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह. समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करिअर कट्टा या उपक्रमा अंतर्गत आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील यांनी भूषवले. करिअर कट्टा कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. एस. पी. कापडे यांनी केले. कार्यक्रमाचे वक्ते प्रा. गणेश जाधव यांनी मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांनी जीवनात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी उत्तम करिअर वेळेवर निवडणे आवश्यक आहे, त्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणे अनिवार्य आहे व मोठमोठे स्वप्न पाहिली पाहिजेत.

कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील यांनी मार्गदर्शन केले. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध केले पाहिजे, यश प्रयत्नावर अवलंबून असते, त्यासाठी जिद्द आणि कष्ट घेण्याची तयारी असली पाहिजे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी वैष्णवी माळी हिने केले तर आभार प्रा. सुभाष कामडी यांनी मानले. यावेळी प्रा. डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. डॉ. संतोष जाधव, प्रा. जगदीश चौधरी, प्रा. सी. टी. वसावे, प्रा. भारती सोनवणे, प्रा. वैशाली कोष्टी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष ठाकूर, प्रमोद भोईटे, तेजश्री कोलते, प्राची निळे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content