यावल – लाईव्ह ट्रेंड न्युज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज व्दारे संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यू. ए. सी. व प्लेसमेंट सेल अंतर्गत जिओ स्मार्ट सेल्स विद्यार्थ्यांसाठी संदर्भातील प्रशिक्षणाचे कार्यक्रम हाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
सदर महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजीत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य ए. पी. पाटील होते. विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधीसाठी घेण्यात आलेल्या मार्गदर्शनपर प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती जिओ सेंटरचे मॅनेजर शोएब खान व चॅनल सेल्स मॅनेजर संदीप पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. या मार्गदर्शनपर प्रशिक्षण कार्यक्रमात द्वितीय वर्ष विज्ञान वर्गातील बहुसंख्य विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एच. जी. भंगाळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. आर. डी. पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन चौधरी, सचिन बारी, यतीन पाटील, पूजा पाटील, वैष्णवी चौधरी यांनी सहकार्य व परिश्रम घेतले.