यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलितत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयत ११ ऑगस्ट रोजी विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त व्याख्यान व काव्य वाचनाचे आयोजन विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सभा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी भूषविले.
प्रारंभी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकास डॉ.सुधा खराटे यांनी विद्यापीठ नामविस्तार दिन आयोजनामागील भूमिका विशद केली. काव्यवाचन उपक्रमात सायली भागवत, लता पाटील, तेजश्री कोलते, प्राची पाटील व चेतना कोळी यांनी बहिणाबाईंच्या कविता सादर केल्या. वैष्णवी माळीने बहिणाबाईंच्या जीवनाविषयी माहिती सांगितली.
उपप्राचार्य प्रा. ए .पी .पाटील यांनी “बहिणाबाईंच्या कवितेतील सौंदर्य” या विषयावर विचार व्यक्त केले की अतिशय साध्या, सोप्या बोली भाषेत बहिणाबाईंनी काव्य निर्मिती केलेली आहे. त्यांच्या काव्यात सहजता, उत्कटता व चिंतनशीलता दिसून येते. अध्यक्षीय भाषणात डॉ. संध्या सोनवणे यांनी मार्गदर्शन केले की “बहिणाबाईंच्या कवितेत जीवनाविषयीचे चिंतन मनन व तत्वज्ञान दिसून येते. त्यांच्या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य गेयता आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास प्रमुख डॉ. एस.पी. कापडे यांनी केले तर आभार डॉ.पी.व्ही .पावरा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. आर. डी .पवार ,डॉ. एच.जी. भंगाळे, मिलिंद बोरघडे, प्रमोद भोईटे, संतोष ठाकूर, प्रमोद जोहरी व अनिल पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला अनेक विद्यार्थी उपस्थित होते.