यावल महाविद्यालयात निबंध स्पर्धेत तबस्सुम तडवी प्रथम

यावल, प्रतिनिधी | येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागामार्फत ‘ओझोन दिन’ निमित्त ‘झोन वाचवा -निसर्ग वाचवा’, या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत तबस्सुम तडवी प्रथम  तर दुर्गा वाघ द्वितीय आली आहे.

 

 

प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेत महाविद्यालयातील एकुण १८ विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यात प्रथम क्रमांक – तबस्सुम रज्‍जाक तडवी (तृतीय वर्ष कला),  द्वितीय-दुर्गा अशोक वाघ (तृतीय वर्ष विज्ञान), तर तृतीय  हेमांशू महेंद्र नेवे (तृतीय वर्ष वाणिज्य) क्रमांक मिळवून स्पर्धेत यश मिळवले. तसेच उत्तेजनार्थ म्हणून तडवी अंजुम छबु (द्वितीय वर्ष कला) व रविंद्र वसंत कोळी(द्वितीय वर्ष कला) यांची निवड करण्यात आली. ह्या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. ए. पी. पाटील, डॉ. सुधा खराटे, डॉ. एच. जी. भंगाळे, प्रा. एस. आर. गायकवाड, मिलिंद बोरघडे यांनी केले. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. एस. पी. कापडे व प्रा. डॉ. पी.व्ही.पावरा यांनी काम पाहिले. या निबंध स्पर्धेचे आयोजन रसायन शास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर. डी. पवार यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रमोद कदम, अनिल पाटील, संतोष ठाकूर यांनी कामकाज पहिले.

 

Protected Content