यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी राज्य एसटी परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक शिवाजीराव जगताप यांच्याकडे यावलच्या मागील अनेक वर्षापासुन प्रलंबीत बसस्थानकाच्या नविन ईमारतीसह आदी कामांना गती देण्या विषयांची मागणी केली आहे.
या संदर्भात राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी महाराष्ट्र राज्य एसटी वाहतुक परिवाहन महाव्यवस्थापक शिवाजीराव जगताप यांची भेट घेतली. यावल एसटी आगारातील विविध समस्या व अडचणी बाबतचे लिखित पत्र दिले व समस्या सोडविण्याची मागणी केली. परिवहन महाव्यवस्थापक जगताप यांच्या कडुन मागण्या विषयी सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे प्रा येवले यांनी सांगीतले.
यावल तालुका हा केळी शेतीसाठी प्रसिद्ध असुन मोठया प्रमाणावर या ठीकाणी केळी बागायत केली जाते, तालुक्यात मोठया प्रमाणावर शेतकरी कुटुंबातील मुल ही वैद्यकीय शिक्षणासाठी पुणे , नांदेड , छत्रपती संभाजीनगर, मुंबई या ठीकाणी जावे लागते, त्याचप्रमाणे परिसरातील व्यापारी वर्गास या शहरात जावे लागते, यावलच्या एसटी आगारातुन मागणी असुन देखील लांब पल्यांच्या एसटी बसेस जात नसल्याने प्रवाशासाठी मोठया अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी नांदेड भुसावळ मुक्कामी बस यावल पर्यंत वाढवावी, भाविकांसाठी यावल तुळजापुर मार्ग अक्कलकोट ही नविन बस सुरू करावी, यावल ते पुणे (रातराणी) या बसच्यांच्या सोयीसाठी वेळेत बद्दल करून १६, ३० वाजे ऐवजी १९ वाजता करावी, यावल ते इंदौर ही बस सेवा पुर्वरत करावी , यावल नाशिक त्र्यंबक मार्ग भोईसर ही नविन बससेवा सुरू करावी, यासाठी यावल आगारात असलेली एसटी वाहनांची नगन्य संख्या तात्काळ वाढवावी आणी सर्वात महत्वाचे म्हणजे यावल एसटी बस स्थानकाची अत्यंत जिर्ण झालेल्या ईमारतीच्या मंजुर झालेल्या कामांना गती देवुन पुर्ण करावे अशा प्रमुख मागण्याचे निवेदन प्रा मुकेश येवले यांनी महाराष्ट्र राज्याचे एसटी महामंडळ परिवहन वाहतुक महाव्यवस्थापक शिवाजीराव जगताप यांना दिले आहे. यावेळी परिवहन महा व्यवस्थापक जगताप यांच्याकडून मागण्यांविषयी सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे प्रा. येवले यांनी सांगीतले.