यावल बसआगारात नादुस्त बसेस देखरेखीच्या नावाखाली सावळा गोंधळ

यावल प्रतिनिधी । येथील महामंडळाच्या एसटीच्या आगारात ग्रामीण भागातील नागरीकांची  जिवनवाहीनी लालपरीची अत्यंत दयनिय अवस्था झाली असुन यावलच्या आगारात निम्याहुन अधिक एसटी बसेस गाडया या नादुरूस्त अवस्थेत असल्याने प्रवासांच्या वेळेचा आणि पैसांचा खेळखंडोबा सुरु आहे.

यावलच्या एसटी आगारात मागील अनेक दिवसापासुन जुनाट नादुरुस्त आणी भंगार अवस्थेत असलेल्या अनेक प्रवासी बसेस असुन, या एसटीबसेस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवासांचे जिव धोक्यात आल्यासारखेच म्हणावे लागेल. आधीच आगारात कमी एसटी बसेस असून त्यातच निम्याहुन अधिक बसेस या नादुरुस्त झालेल्या आहेत. यावल बस आगारातुन इतर आगारांच्या तुलनेत फारच कमी लांब पल्यांचे शेडुयल सोडले जातात आणि त्यात देखील लांब पल्यांच्या बसेस देखील अनेक वेळा नको त्या ठिकाणी बंद पडतात. यामुळे प्रवासांचा पैसा आणी वेळ दोघही वाया जात असुन प्रसंगी जिव देखील धोक्यात येण्याची ही भिती प्रवासांच्या मनात असल्याची ओरड प्रवासांच्या वतीने करण्यात येत असते , प्रवासांच्या या गंभीर प्रश्नाकडे कुणाचेही लक्ष नसल्याने प्रवासावर्ग कालबाह्य झालेल्या खाजगी वाहनाकडे वळला असुन, नादुरुस्त वाहनाचा आकडा संपुर्ण जळगाव जिल्ह्यातील विविधआगारातअनेक बसेस नादुरुस्त असल्याचे सांगण्यात येत असुन या नादुरुस्त बसेसच्या दुरुस्ती व देखरेखच्या नांवाखाली फार मोठा सावळा गोंधळ असल्याचे विश्वसविनय वृत असुन , राज्य शासनाने तात्काळ या नादुरुस्त व जुनाट भंगार जमा झालेल्या एसटी बसेस जमा करून नवीन बसेस उपल्बध करून द्याव्यास व नादुरूस्त अशी मागणी नागरीकांकडुन करण्यात येत आहे .

Protected Content