यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | यावल ते फैजपुर या मार्गावरील गतीरोधक तात्काळ कमी करावे, अशी मागणी यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
तालुक्यातील यावल ते फैजपुर या मार्गावरील हंबर्डी व हिंगोणा या दोन गावांच्या बस स्थानकाजवळच्या परिसरातील रस्त्यावर क्षमतेपेक्षा अधिक लावण्यात आलेले गतीरोधक हे अपघातास व वाहनधारकांच्या विविध दुखापतीस कारणीभुत ठरत आहे. यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ ही गतीरोधक कमी करावी, अशी मागणी होत आहे.
यावल ते फैजपुर या सार्वजनिक वर्दळीच्या मार्गावर असलेल्या हंबर्डी आणि हिंगोणा या गावातील बसस्थानक परिसरावरील रस्त्यावर वेगाने धावणाऱ्या वाहनाकंडुन होणारा संभाव्य अपघाताचा धोका टाळण्यासाठी ग्रामस्थांनाच्या मागणी वरून गावाजवळच्या रस्त्यावरून वाहनांचा वेग कमी व्हावा, या हेतुने टाकण्यात आलेले गतीरोधक आता वाहनधारकांच्या अपघातास व विविध दुखापतीस कारणीभुत ठरत असल्याने वाहनाधारकासाठी ही गतीरोधक धोकादायक बनले आहे.
यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन न्यायालयाकडुन गतीरोधक टाकण्यास मनाई असुन देखील गरजेपेक्षा व क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात टाकण्यात आलेले हिंगोणा आणी हंबर्डी या गावांना लागुन असलेल्या रस्तयाच्या ठीकाणा वरील गतीरोधकांची संख्या मर्यादीत करावी, अशी मागणी असंख्य वाहन धारकांकडुन करण्यात येत आहे.