यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात गेल्या ४० दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलीस बांधवांकडून संचारबंदीत खडा पहारा दिला जात आहे. पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
संपूर्ण देशासह राज्यात गेल्या 40 दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गजन्य सातत्याने वाढताना दिसत असून आपल्या पोलिस बांधवांना सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून या आजाराचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशात यावेळी संचारबंदी लावण्यात आली. या काळात नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी आपले पोलिस प्रशासन आपले जीव धोक्यात घालून अहोरात्र परिश्रम घेऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. अशा प्रसंगी पोलिसांची देखील आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त असल्याने यामुळे यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांच्यासह आरोग्य कर्मचारी यांनी यावल पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पो.नि. अरुण धनवडे, पोउनि जितेंद्र खैरनार, पोउनि सुनिता कोळपकर, पोउनि विनोद खंडबहाले, स.फौ. अजिज शेख, मुजफ्फर पठाण यांच्यासह पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.