यावल प्रतिनिधी । वेळेत जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकार्यांनी यावल पंचायत समितीमधील भाजपच्या सदस्या लताबाई भगवान कोळी यांना अपात्र घोषित केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत भाजपच्या लताबाई भगवान कोळी यांनी सांगवी-भालोद गणातून अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवर विजय मिळवला होता. निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत त्यांना जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. तथापि, त्यांनी हे प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे काँग्रेसचे गटनेते शेखर पाटील यांनी ३० ऑगस्ट २०१८ रोजी कोळी यांच्या अपात्रतेसाठी तक्रार केली होती. यावर जिल्हाधिकार्यांनी निर्णय देऊन लताबाई कोळी यांना अपात्र ठरविले.