यावल, प्रतिनिधी । येथील पंचायत समितीच्या कार्यालयात पुणे आयुक्तालयाच्या माध्यमातुन दिव्यांगासाठीचे सल्ला कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षातुन तालुक्यातील ‘दिव्यांग बांधवांना स्थानीक स्वराज्य, दिव्यांगसाठी पुर्तता बिज भांडवल मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
यावल पंचायत समितीच्या कार्यालयात गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांच्या हस्ते उदघाटन करून या दिव्यांग बांधवांसाठीच्या स्वत्रंत मार्गदर्शन कक्षाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मुक बधीर विद्यालय चोपडा मुख्याध्यापक डॉ. रवीन्द्र बहुराळे , मनोज पाटील समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी यावल तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या अपंग दिव्यांग कक्षाच्या माध्यमातुन मुकबधीर व अंध अपंगबांधवांना शासनाच्या वतीने मिळणाऱ्या विविध कल्याणकारी योजनाचे लाभ मिळण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहीती यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी केले आहे.