Home धर्म-समाज यावल निवासी तहसीलदारांचे कुटुंब सरसावले; कोरोनाबाधीतांसाठी ११ हजाराची मदत

यावल निवासी तहसीलदारांचे कुटुंब सरसावले; कोरोनाबाधीतांसाठी ११ हजाराची मदत


यावल प्रतिनिधी । कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाग्रस्तांना आर्थिक मदतीसाठी येथील निवासी नायब तहसीलदारांचे कुटूंबियांनी ११ हजार रूपयांची मदत केली आहे.

राज्यात कोरोना बाधीत रूग्णांची संख्याही हजारोच्या घरात पहोचली आहे. राज्य शासनाकडुन नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून युद्धपातळी उपाययोजना करण्यात येत आहे. संपुर्ण देशावर ओढवलेल्या या जैविक संकटासमयी शासनाच्या आणि नागरीकांच्या मदतीला अनेकांचे हात सरसावले आहे. यावल येथील तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार म्हणुन कार्यरत असलेले आर.के.पवार रा. पाल ता.रावेर यांचे चिरंजिव व हिंदुजा हॉस्पीटल मुंबई येथे आपली सेवा देत असलेले डॉ. अक्षय रामकिशोर पवार यांनी मुख्यमंत्री सहायता निधी करीता ११ हजार रूपयांची मदत केली. फैजपुर विभागाचे प्रांत आधिकारी डॉ . अजीत थोरबोले यांच्याकडे धनादेश स्वाधिन केला आहे. या प्रसंगी तहसीलदार जितेन्द्र कुवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound