यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील बुऱ्हाणपुर अंकलेश्र्वर राज्य मार्गावरील यावल ते किनगाव दरम्यानच्या रस्त्याची दयानिय अवस्था झाली असुन काही दिवसापुर्वीच या मार्गाची तात्काळ दुरुस्ती व्हावी, या मागणीसाठी लोकप्रतिनिधींनी यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. मात्र या उपोषणाअंती तात्काळ थातुर मातुर रस्ता दुरूस्ती करण्यात आली मात्र ही दुरूस्ती निकृष्ठ प्रतिची झाल्याने रस्त्याची अवस्था पुनश्च जैसे थी झाली आहे.
यावल शहराला व तालुक्यास मध्यप्रदेश, गुजरात अशा दोन राज्यांना जोडणारे बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्गावरील या वाहनाच्या वर्दळीचे यावल ते किनगाव या रस्त्याची चाळण झाली असुन ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असुन रस्त्यात खड्डा की खुडुयात रस्ते अशी अवस्था रस्त्याची झाली आहे. मागील एक वर्षात या रस्त्यावर मोटर वाहनाचे भिषण अपघात होवुन यात अनेक निरपराधानी आपले जिव गमावले आहे. या मार्गावर वारंवार होणाऱ्या रस्त्यातील खड्डयांमुळे होणाऱ्या अपघाताची मालीका थांबावी, या दृष्टीकोणातुन साकळी येथील जिल्हा परिषदचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती रविन्द्र पाटील ( छोटु भाऊ ) यांनी यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. या आमरण उपोषणास रावेरच्या खासदार रक्षताई खडसे यांनी उपोषणकत्याची उपोषणास्थळी भेट देवुन सदरच्या मार्गावरील रस्ते प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावे, असे संबधीत विभामास आदेश दिले होते.
दरम्यान उपोषणानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या यावल ते किनगाव दरम्यानच्या रस्त्यावरील अत्यंत निकृष्ठ प्रतिची निव्वळ देखाव्याची दुरूस्ती केल्याने दोनच महीन्यात या रस्त्यात पुनश्च मोठमोठे खडडयांमुळे मार्गाची दयानिय अवस्था झाली असुन, यावल सार्वजनिक बांधकाम विभागाने लोकप्रतिनीधींच्या उपोषणास गांर्भीयांने न घेता केवळ देखाव्याची थातुरमातुर रस्ता दुरूस्ती केल्याने लोकप्रतिनिधींच्या तोंडाला पानेपुसले की काय अशी चर्चा सर्वत्र होत आहे.