यावल तालुक्यात मुलींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबीर

यावल  प्रतिनिधी । किशोरवयीन मुलींना योग्य व शास्त्रीय मार्गदर्शनाची गरज ओळखून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी ह्या ग्रामीण व आदिवासी गावात वाडया वस्तीवर जाऊन विशेष मार्गदर्शनपर शिबिर घेऊन उपक्रम राबवित आहेत. आज त्यांनी कोरपावली या गावात कोविड१९च्या नियमांचे काटेकोर पालन करून शिबीर घेतले .

यावेळी उपस्थितांना  मार्गदर्शन करतांना वैद्यकीय अधिकारी डॉ नसिमा तडवी या म्हणाल्यात आजचे किशोरवयीन विद्यार्थी हे उद्याचे तरुण असतील. त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य हे सशक्त असायला हवे. म्हणून किशोरवयीन ( ११ ते १९ वर्ष ) वयोगटातील मुला-मुलींना योग्य व शास्त्रीय मार्गदर्शनाची गरज ओळखून डॉ. नसीमा तडवी ह्या  गावागावात जाऊन तेथील आरोग्य विभागातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका व सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने किशोरवयीन मुलींसाठी एक उत्कृष्ठअसे उपक्रम राबवित आहेत.

यावल तालुक्यातील सावखेडासिम, हरीपुरा, परसाडे व आज कोरपावली या गावात मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. शिबिरास मोठ्या संख्येने मुलीं सहभागी झाल्या होत्या. डॉ. नसीमा तडवी यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक समस्या, वैयक्तिक स्वच्छता, होणारे शारीरिक बदल व मासिक पाळी विषयी समस्या आदी विषयाबाबत आरोग्यविषयक अमुल्य मार्गदर्शन केले. व मुलींच्या शंका व समस्या जाणून घेऊन त्याचे डॉ. तडवी यांनी निरसन केले. यावेळी आलेल्या सर्व किशोरवयीन मुलींना मास्क वाटप करण्यात आले. व आवश्यकतेनुसार लोह आणि कॅल्शियम ची मोफत औषधी देण्यात आली.

डॉ. नसीमा तडवी या नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी कामे करीत असतात. त्यांच्या या अशा सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कार्यक्रमासाठी गटप्रवर्तक हेमांगी फेगडे, आशा सेविका हिराबाई तडवी, फरीदा तडवी, सायरा तडवी, व अंगणवाडी सेविका संगीता तडवी आदींचे सहकार्य लाभले.

 

Protected Content