यावल तालुक्यात पल्स पोलिओ मोहिमेस प्रारंभ

 

यावल, प्रातिनिधी । तालुक्यात पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ आज साकळी आरोग्य केद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. सागर पाटील यांच्या हस्ते प्रथम लाभार्थी चिमकल्या मुलाला पोलिओचा डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

या मोहीमेत ० ते ५ वर्षाच्या आतील २१३ बालकाना पोलीओ डोस देण्यात आले. चुंचाळे जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी या ठिकाणी पोलीओ केंद्र बुथ स्थापन करण्यात आले होते. या राष्ट्रीय आरोग्य मोहीमेच्या कार्यक्रमास स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने चांगला प्रतिसाद मिळाला असून जवळ जवळ १००% उद्दीष्ट पूर्ण करण्यात आले. यावेळी यावल तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत बऱ्हाटे, साकळी प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर पाटील व वढोदा उपकेद्राचे सी.एच.ओ. डॉ. अमोल अहीरे यांनी चुंचाळे बोराळे या गावातील येथील पोलीओ बुथला भेट देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. पल्स पोलीओ मोहिम प्रभावीपणे राबवण्यासाठी साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य विभागाचे आरोग्य सेवक संदिप शिदे आशा स्वयंसेविका, जयश्री चौधरी, सलीमा तडवी, सुनैना राजपुत अंगणवाडी सेवीका, मदतनीस यांनी पोलीओ मोहिम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. दरम्यान, पल्स पोलिओ मोहिमेच्या राष्ट्रीय कार्यात आपला हातभार लागावा या हेतूने चुंचाळे ग्रामपंचायत सदस्य सुकलाल राजपुत यांनी प्रा.आ.केंद्राच्या पोलिओच्या बुथवर जाऊन लहान बालकांना पोलिओचा डोस पाजला.

Protected Content