यावल प्रतिनिधी । यावल येथील कोवीड केअर सेंटरने संशयित कोरोना रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज दुपारी यावल येथील आरोग्य विभागाला अहवाल प्राप्त झाला असून त्यात तालुक्यातील चार रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेत. यातील एकाचा रविवारी मृत्यू झाला होता. प्रभारी तालुका वैद्यकिय अधिकारी मनिषा महाजन यांनी दुजोरा दिला आहे.
आज आढळून आलेल्या रूग्णात चोपडा रोडवरील अक्सा नगर १, यावल मेन रोड परिसरातील पती-पत्नी तर एकाचा रविवारी ७ जून रोजी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आले होते. त्याचाही रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. तर फैजपूरातीलही मयताचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तालुक्यातील एकुण बाधितांचा आकडा ६० पर पोहचाला असून एकुण ६ जणांचा कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. दरम्यान तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता फुगत चालला आहे. दरम्यान आज आढळून आलेल्या कोरोनाबाधितांच्या वास्तव्यास असलेला परिसर आरोग्य विभागाकडून सील करण्याचे काम करण्यात येत आहे. तालुकावासीयांनी आपल्या घरात रहा, सुरक्षित रहा असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुंवर, प्रभारी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. मनिषा महाजन, पोलीस निरीक्षक अरूण धवडे यांनी केले आहे.