यावल प्रतिनिधी । कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भाव मोठया वेगाने वाढु लागले असुन शहरात गुरूवारी रात्री उशीरापर्यंत दोन रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. यात एक यावल शहरातील तर दुसरा तालुक्यातील भालोद येथील आढळलेत. तालुक्यात एकुण रूग्ण संख्या ३२ झाली असून १०३ जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहे.
तालुक्यातील बाधीतांची एकुण संख्याही ग्रामीण भागात १० तर शहरी भागात २२ अशी तर तालुक्यातील रुग्ण संख्या ही ३२ वर पहोचलीय. या पार्श्वभुमीवर संपुर्ण आरोग्य यंत्रणेला प्रशासनाने अधिक दक्ष व सर्तक राहण्याचे आदेश दिले आहे. यावल तालुक्यात कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र विळखा घातला असुन मागील २० दिवसांपासुन कोरोनाबाधीतांच्या संख्येत वेगाने वाढ होतांना दिसुन येत आहे. तालुक्यातील फैजपुर ३, कोरपावली २, दहिगाव १, चुंचाळे १, चिंचोली १, आमोदा १, भालोद १, सातोद १, बोरावल खुर्द १ यासह यावल शहरातील सुदर्शन चित्र मंदीर परिसर ३, पुर्णवाद नगर १, तिरुपती नगर १, बाबुजीपुरा ५, खाटीक वाडा १, मेन रोड वसुले गल्ली १, कोलते वाडा १, सिद्धार्थनगर २, यावल खरेदी विक्री संघ व्यापारी संकुलन १, आयडीबीआय बँक १, यावल कोर्ट परिसर १, यावल चोपडा रोड वरील वर्कशॉप परिसर १ तर ४ जुन रोजी साई प्रभु लिला नगर १ अशी रुग्णांची बाधीत संख्या असुन १९ प्रभागातील ही सर्व क्षेत्र प्रतिबंधीत घोषीत करण्यात आली आहेश्.
बाधीत रूग्णसंख्या ही ३२ वर पोहचली असुन यातील तिन कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांचा आणी तिन कोरोना संयशितांचा अशा एकुण सहा जणांचा मृत्यु झाला आहे आणि यावल तालुक्यातीत १०३ रुग्णांचे स्वॅब कोरोना चाचणी अहवाल अद्याप जळगाव कोवीड सेन्टरला प्रलंबीत आहेत . या सर्व परिस्थितीचे गांर्भीय लक्षात घेवुन खबरदारीचा उपाय म्हणुन प्रांत अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी तात्काळ कार्यतत्परता दाखवुन आरोग्य प्रशासनास अतिदक्ष राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.